✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड- तालुक्यातील बाळदी ग्रामपंचायत येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. महापरिनिर्वाण दिन हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. दरवर्षी सहा डिसेंबर रोजी हा दिवस संपूर्ण देशभर, विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या आदराने आणि श्रद्धेने पाळला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते.त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते.


त्यामुळे सहा डिसेंबरला जगातून तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येतात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे आज बाळदी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये, तांड्यावरील व गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

यावेळी भीम टायगर सेना महिला तालुका अध्यक्ष लिलाबाई हटकर ग्रामपंचायतचे सरपंच डॉक्टर भगवान बोरकर, ग्रामपंचायत माजी सरपंच प्रदीप शिरडकर सचिव डी.बी. सूर्यवंशी गणपत ठोके, विनोद टिपरे,विकास खिल्लारे,शांताराम खिल्लारे,अतिश वटाणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.







