✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दि. 26 डिसेंबर) गो.सी.गावंडे कनिष्ठ महाविद्यालयाचे रासेयोचे शिबिर दत्तक ग्राम नागेशवाडी येथे सुरू असून पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात प्रभात फेरी काढून गावात स्वच्छता करण्यात आली. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छते विषयी जनजागृती करून लोकांमध्ये स्वच्छते विषयी माहिती सांगण्यात आली.
दुसऱ्या सत्रात अंधश्रद्धा निर्माण करण्यासाठी विज्ञानाचा वापर करण्यात समाजातील तथाकथित लोक आघाडीवर असतात असे प्रतिपादन प्रा. डॉ.पी. वाय. अनासाने यांनी याप्रसंगी सांगितले. प्रा. आशीर्वाद मोरे यांनी श्रद्धा ही डोळस असावी श्रद्धेतील विज्ञान समजून घेऊनच जीवन जगावे. शिक्षणच हे या अंधश्रद्धेतून व्यक्तीला बाहेर काढण्याचे काम करत असते. असे विचार मांडले.

याप्रसंगी सोहम सूर्यवंशी या स्वयंसेवकांने पोवाडा सादर केला. प्रा. मिलिंद कांबळे यांनी तुळशीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला.अध्यक्षीय समारोप करताना प्रा. जी बी .जाधव यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव जागृती होण्यासाठी अशा शिबिरांची गरज व्यक्त केली. यादरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बद्दल मनोगत प्रीती सोनटक्के या स्वयंसेविकेने व्यक्त केले.

तसेच सोहम सूर्यवंशी व गौरव जाधव यांनी अंधश्रद्धेवर आधारित लघुनाटिका सादर केली.सूत्रसंचालन कोमल पाईकराव तर प्रास्ताविक रोशनी वडपत्रे आभार प्रदर्शन जय गिरी या स्वयंसेवकाने केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही बी. कनवाळे,महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. साधना देशमुख सह कार्यक्रमाधिकारी प्रा.ए. जे.सूर्यवंशी यांनी विशेष प्रयत्न केले. ‘खरा तो एकची धर्म ‘या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



