🚨रा.से.योच्या सात दिवशीय शिबिराचा समारोप!

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दि. 28 डिसेंबर) राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात आमुलाग्र बदल घडवत असते असे उद्गार गो.सी. गावंडे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. यु. लाभोसेटवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या समारोपप्रसंगी काढले.

मंचावर उपस्थित मॉडर्न पब्लिक स्कूल आणि जूनियर कॉलेजचे प्राचार्य, प्रकाश शिंदे उपस्थित होते त्यांनी महाविद्यालयीन जीवनात असे शिबिरे महत्त्वाचे असतात विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, श्रमसंस्कार तसेच व्यक्तिमत्व विकास असे गुण विकसित होत असतात.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. एस.डी. शिरगिरे (माजी कार्यक्रमाधिकारी) यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले यादरम्यान निरोपाच्या प्रसंगी दिनेश कुशवाह या विद्यार्थ्यांनी केले आपले मनोगत व्यक्त केले.विशेष शिबिराचा आढावा प्रा. साधना देशमुख यांनी मांडला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा व्हि. बी.कनवाळे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. साधना देशमुख व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा ए. जे. सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूजा लामटिळे या स्वयंसेविकेने केले.’ खरा तो एकची धर्म’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



