✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो

पुसद:- केवळ समाज बांधवांच्या देणगीतून बोधिसत्व बुद्ध विहाराची निर्मिती ही इतर राज्य, जिल्ह्यासाठी प्रेरणा व दिशादर्शक ठरेल. स्वाभिमानी, वैचारिक,एकनिष्ठ तथा सुसंस्कृत घडविण्याचे महान कार्य येथून घडविणार असल्याने पुढील पिढीसाठी आदर्शवादी असेल असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी भारतीय बौध्द महासभा यवतमाळ तथा बांधकाम समितीचे वतीने बोधिसत्व बुद्धविहार लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उद्घाटनीय भाषणातून मत व्यक्त केले.

सर्वप्रथम बोधिसत्व बुध्दविहाराचे उद्घाटन फीत कापुन डॉ. भिमराव आंबेडकर साहेबांनी केले.तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन पुष्पहाराने मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले. भंते बी नागसेन यांनी सामुहिक त्रिसरण पंचशील वंदना घेतली. यानंतर विहाराची पाहणी करण्यात आली. जाहीर धम्मसभेचे आयोजन समता मैदान येथे करण्यात आले.

प्रथम डॉ. भिमराव आंबेडकर साहेबाना समता सैनिक दल यवतमाळच्या वतीने सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रविजी भगत चेअरमन बोधिसत्व बुद्धविहार समिती हे होते. तर प्रमुख पाहुणे कैप्टन प्रविण निखाडे आंतरराष्टीय सचिव,जगदिश गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष,एस के.भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष, वसंत पराड राष्ट्रीय सचिव, यु.जी. बोराडे राज्याध्यक्ष, पदमाकर गणवीर राष्ट्रीय संघटक, विजयकुमार चौरपगार राज्य संघटक यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.याशिवाय धम्म मंचावर नेताजी भरणे चंद्रपूर,सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन भवरे जिल्हाध्यक्ष यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात रविजी भगत यांनी बोधिसत्व बुद्धविहार निमिर्ती करतानाचा संघर्षमय प्रवास भूमिकासह सर्व लेखाजोगा कथन केला व दानदाते यांचे धन्यवाद मानले.यावेळी रविजी भगत यांचा सत्कार करण्यात आला. नोकरीचा पहिला पगार देणारे तथा एक लाखाच्या वर देणगी देणारे यांचाही सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन रुपेश वानखडे यांनी केले तर आभार रंजनाताई ताकसांडे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी चंद्रपूर , वर्धा नागपूर , अमरावती, वाशिम,अकोला इत्यादी जिल्हा पातळीवरील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका शाखेचे पदाधिकारी , व जिल्हा शाखेचे पदाधिकारी, धम्मबांधव, धम्मभगिनी केंद्रीय शिक्षिका,केंद्रिय शिक्षक,यासह हजारोच्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.



