💥”रात्रीच्या वेळेस नागरिकांनी सतर्क राहावे” – वनविभाग प्रशासन

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड:- जिजाऊ नगर येथील रहिवाशी श्री.संतोष मत्ते यांच्या घरासमोर रात्री दीड वाजताच्या सुमारात बिबट्या आढळल्याची बातमी खरी असून पोलीस प्रशासन यांनी भरपूर मदत केली असून फॉरेस्ट विभागाची टीम स्पॉटवर पाठवली.

हनुमंतराव गायकवाड डीवायएसपी आणि शंकर पांचाळ ठाणेदार उमरखेड यांनी मिळालेल्या माहिती लगेच दखल घेऊन सदर भागांमध्ये रात्रीची गस्त वाढवली आहे.त्यामुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे धन्यवाद व आभार व्यक्त केली आहे.



