✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

नांदेड : (दि.30 डिसेंबर) साने गुरुजी जयंती निमित्त जीवन सुरक्षा हेल्थ केअर ट्रस्ट च्या वतीने संजय खाडे यांना पत्रकारिता क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पत्रकारिता क्षेत्रातला 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव बघता सातत्याने लोकांचा आवाज बनून दैनिक दैनिक, प्रबुध्द परिवार मधून प्रश्न मांडून प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी च्या माध्यमातून सोडविले जातात आणि सामान्य गरजु लोकांना काय मदत करता येईल ते पाहत असतात. तसेच ऑल इंडिया संपादक संघ चे मराठवाडा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत महाराष्ट्र भरातील संपादक यांना व अनेक पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडवतात.

संजय खाडे यांना साने गुरुजी जयंती निमित्त जनभूषण राष्ट्रीय पुरस्कार दि. 21 डिसेबर 25 घोषित झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्यांना हा पुरस्कार हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पत्रकारिता सोबतच त्यांचे सामाजिक, राजकीय,क्रीडा कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. जीवन सुरक्षा हेल्थ केअर ट्रस्ट ने त्यांच्या साहित्य व समाज उपयोगी कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्यांना हा पुरस्कार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी शिवराज्य प्रतिष्ठान निवासी गुरुकुल सारंग स्वामी शाळेच्या बाजूला विवेक नगर परभणी येथे हा जनभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दैनिक प्रबुद्ध परिवार वृत्तपत्राचे मुख्य संपादक मा. श्री संजय खाडे सर यांना भीम टायगर सेना,जनहित 24 न्यूज नेटवर्क,, महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल कडून त्यांना खूप खूप अभिनंदन व पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा…!



