✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड:- तालुक्यातील संवेदनशील विडुळ या गावात वरळी मटक्याने थेमान घातले असून आरिफसेठ नामक व्यक्ती ने अख्या विडुळला कवेत घेतले आहे. आणि अल्पवयीन मुलांच्या हाती पुस्तकाऐवजी मटक्याच्या बुक्की सोपविण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येतं आहे. यामुळे अल्पवयीन मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

पोलिसांना आम्ही हप्ते पुरवितो आम्हाला कुणाची भीती या अविर्भावात बुकी चालक गावात वावरत असून अरेरावीची भाषा करीत आहेत. यवतमाळ जिल्यातील उमरखेड तालुक्यातील विडुळ हे गावं आधीच जातीय तणावामुळे बदनाम झाले आहे, त्यातच आरिफसेठ सारखे मटकावल्यामुळे वातावरण दूषित होत चालले असल्याचे बोलले जात आहे.

अख्या गावाला या माणसाने वेड लावले असून अनेकांचे संसार उध्वस्थ होत चालले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेबांनी या प्रकरणात व्यक्तिशः लक्ष देऊन सदरील मटकावल्याचा बंदोबस्त करून तत्काळ बंद करावा. अशी मागणी गावकऱ्यांची जोर धरत आहे.



