🔥(पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पण संपादक पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत !)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड- येथे शासकीय विश्रामगृह मध्ये दर्पण संपादक पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम मावळते अध्यक्ष डॉ.आयुब खा पठाण यांनी संविधानाच्या प्रतीचे व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदी सय्यद फारुख यांची निवड करण्यात आली व सचिव पदी सतीश कोल्हे यांची निवड करण्यात आली.

कार्यकारणी उपाध्यक्ष शेख जमीर, कार्याध्यक्षपदी दिगांबर मनवर ,कोषाध्यक्ष रहीम रजा, सल्लागार म्हणून डॉ.आयुब खा पठाण, चुंनुमिया काजी, सदस्य म्हणून सुभाष वाघाडे,मौलाना शेख मदार ,शेख निसार ,कैलास आढागळे, बुध्छघोष ढोले, शाहिद इकबाल ,दत्ता शिंगारे इत्यादिंची निवड झाली.

यावेळी माजी अध्यक्ष डॉ.आयुब खान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाळशास्त्री जांभेकर यांचा दर्पण दिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो परंतु दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या सहा जानेवारीच्या कुठल्याही दिनदर्शिकेवर त्यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही अशी खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी पत्रकार बाबत टोल नाका माफी संदर्भामध्ये माननीय गडकरी साहेबांनी सर्व पत्रकारांना टोल फ्री करण्यात येईल अशी घोषणा केली होती, त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही हा निर्णय घेण्यात यावा याकरिता दर्पण संघाच्या वतीने निवेदन देण्यात येईल असेही मत त्यांनी मांडले.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सय्यद फारूक सय्यद दाऊद यांनी आपले मनोगत व्यक्त केले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक सतिश कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष वाघाडे यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






