✍️सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – आज दर्पण वृत्तपत्राचे संपादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिवशी आणि पत्रकार दिनानिमित्ताने जांभेकर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यावेळी पुन्हा एकदा अध्यक्षपदी शामभाऊ धुळे मुख्य संपादक जनहित 24 न्यूज नेटवर्क, उपाध्यक्षपदी गजानन वानखेडे हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी, तर सचिवपदी सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल), कोषाध्यक्षपदी अशोक धुळे (लोक मंच प्रतिनिधी), प्रसिद्धी प्रमुखपदी बबलू भालेराव (मुख्य संपादक महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल), पत्रकार कुणाल श्रवले, सल्लागार म्हणून प्रसेनजीत दिवेकर (नॅशनल टीव्ही 18 तालुका प्रतिनिधी) यांची निवड करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

यामुळे उमरखेड तालुक्यातून तसेच यवतमाळ जिल्ह्यातून या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



