✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

असोली, ता. पुसद, जि. यवतमाळ येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (कां.)च्या ठोस पाठबळामुळे यश मिळाले. उपोषणाच्या प्रमुख मागण्या म्हणजे असोली ते गौळ रस्त्याचे डांबरीकरण तत्काळ सुरू करणे तसेच ग्रामपंचायत असोली येथील बंद वॉटर फिल्टर सुरू करून पाच रुपये दराने स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे या होत्या.या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (कां.)च्या वतीने पुसद ते उमरखेड रोडवर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

या इशाऱ्यानंतर प्रशासनाने दखल घेत संबंधित उपअभियंता, जि. प. बांधकाम विभाग, पुसद जि. यवतमाळ मा. नांदगावकर साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत व भीम आर्मी पुसद टीम यांनी ठाम भूमिका घेत मा. गटविकास अधिकारी साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली.या पाठपुराव्याला यश येत आज असोली–गौळ रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली,

तसेच बंद वॉटर फिल्टर येत्या दोन दिवसांत सुरू करून गावकऱ्यांना पाच रुपये दराने पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यानंतर उपोषणकर्ते मा. यशवंत कोल्हे यांनी आमरण उपोषण मागे घेतले.भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (कां.)च्या ठाम भूमिकेमुळे चक्का जाम आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला,
गावकऱ्यांच्या मूलभूत मागण्यांना न्याय मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी अशोक भालेराव, विशाल डाके, राहुल धुळे, राजकुमार भगत, वैभव सूर्यवंशी भीम आर्मी पुसद तालुका उपाध्यक्ष, करण खंदारे, शांतिशील जाधव, शुभम ढोले उपस्थित होते.




