🔥(ठाणेदार शंकर पांचाळ यांनी केली पत्रकारांकडून केली सहकार्याची अपेक्षा)

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड:- नुकतेच उमरखेड येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रिंट मीडियावर व इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यादरम्यान पत्रकारांना चहापान देण्यात आले.

यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय शंकर पांचाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार नेहमीच प्रशासनाची मदत करत असतात पत्रकार आणि पोलीस यांचा समन्वय आहे यापुढे सुध्दा राहील अशी आशा व्यक्त करताना पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनतेच्या मालमत्तेची हानी होण्यापासून रक्षण करण्यासाठी असाच समन्वय राहिल असा आशावाद व्यक्त केला व पत्रकारांना या पत्रकार दिनानिमित्त पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

यावेळी उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघाचे अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यक्ष गजानन वानखेडे, सचिव सिध्दार्थ दिवेकर, कोषाध्यक्ष अशोक धुळे, प्रसिद्धीप्रमुख बबलू भालेराव, पत्रकार कुणाल श्रवले, सल्लागार प्रसेनजीत दिवेकर तसेच विविध पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.



