✍️ करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)

ढाणकी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर आज हिंगोली खासदार नागेश आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त महिला नगराध्यक्ष अर्चना सुंदरकांता वासमवार यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आज दुपारी दोन वाजता ढाणकी नगरपंचायत येथे भव्य पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पदग्रहणापूर्वी अर्चना सुंदरकांता वासमवार यांनी शहरातील बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्प हार टाकून अभिनंदन करत नगरपंचायत कडे आगेकूच केली. यावेळी त्यांच्यासोबत हिंगोली मतदार संघांचे खासदार नागेश पाटील आष्टीकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


नगरपरिषद सभागृहात प्रथम अधिकृत पदग्रहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षस्थानी खासदार नागेश पाटील आष्टीकर होते. प्रास्ताविक उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ते अविनाश जोशी यांनी केले. पदग्रहण कार्यक्रम अध्यक्ष स्थानी असलेले हिंगोली मतदार संघांचे खासदार नागेश आष्टीकर यांनी प्रथम ढाणकी महिला अध्यक्ष सौ अर्चना ताई सुंदरकांता वासमवार यांचे अभिनंदन करत, ढाणकी नगरपंचायतचे समस्या सोडविण्यासाठी आता राजकारण सोडून सर्वानी एकत्र येत विकास करण्याचे सांगितले. त्यानंतर महिला अध्यक्ष सौ अर्चना ताई सुंदरकांता वासमवार यांनी जनतेचे आभार मानत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तयार राहीन असे सांगितले.

या कार्यक्रमात ढाणकी नगरपंचायत चे माजी अध्यक्ष सुरेश जयस्वाल,ढाणकी नगरपंचायत माजी उपाध्यक्ष जहीर भाई,नगरपंचायत मुख्य अधिकारी अजय कुरवाडे, नगरपंचायत कर्मचारी, माजी बाजार समिती सभापती, बाळू पाटील चंद्रे, नवनिर्वाचित काँगेस 2,एम आय एम 3,शिवसेना शिंदे गट 3 नगर सेवक,शिव सेना शिंदे गट ढाणकी शहर अध्यक्ष संजय सल्लेवाड,शिवसेना उद्धव साहेब ठाकरे ढाणकी शहर अध्यक्ष सुंदरकांता वासमवार, शिवसेना शिंदे गट दत्त दिगंबर वानखेडे, ख्वाजा भाई कुरेशी, अजीज पठाण, ओमा पाटील चंद्रे, गजानन मिटकरे, सर्व पक्षीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.



