✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड तालुक्यातील सुकळी ज. येथील सुकळी जाहगीर ते बोथा गावापर्यंत रस्त्यावरून जड वाहने जातात सुकळी ते बुथा गावापर्यंत हा रस्ता चाळणी झालेला आहे. वेळोवेळी खड्ड्यात मुरूम टाकून गड्डे बुजले जातात रस्त्यावरील दिवसभर जड वाहने जात असताना धुळीचा अक्षरशा धुवार उडतो समोरचा व्यक्ती व वाहने दिसत नाही धूळ त्या रस्त्यावर दिसून येते ही धूळ सरळ नागरिकांच्या तोंडावाटे शरीरात जात असल्यामुळे नागरिकांना विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे. मागील तीन चार वर्षापासून नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

व्यावसायिकांच्या दुकानात धूळ जमा होते सुकळी बोथा गावातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. मात्र या गावाकडे कोणताही प्रतिनिधी लक्ष देत नाही. असं आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शाळेत य -जा करत असताना खूप त्रास सहन करावा लागतो.

या रस्त्यावर अपघात झाल्यास कोण जबाबदार राहील नागरिकांचे म्हणणे आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी सुकळी ज. बोथा गावातील नागरिकांची मागणी आहे.



