🔥 (झोपेचं सोंग घेणाऱ्या पोलिसांना जागे करण्यासाठी महिलांचा मोर्चा धडकला पोलीस स्टेशन ला)
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

बिटरगाव (बु ) च्या हद्दीमध्ये अवैध देशी विदेशी दारू, वरळी मटका,52 पत्याचा जुगार खुलेआम सुरू असल्याने महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत. बिटरगाव येथे पोलीस स्टेशन असून सुद्धा विना परवाना देशी विदेशी दारू, रासायनिक मिश्रित गावठी हातभट्टी दारू विक्रेते खुलेआम दुकाने लावून दारू विक्री करीत आहेत.
वरळी मटक्या चे दुकाने व 52 पत्याचा क्लब च्या नावाने बिनधास्त धंदा करीत आहेत. त्यामुळे शेतकरी, मजूरदार, विध्यार्थी वर्ग व्यसनाधीन होऊन कमावलेले व घरातील हजारो रुपये वरळी मटका, दारू व बावन पत्त्याच्या क्लब वर घालवत आहेत. त्यामुळे बिटरगाव ( बु ) सह पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील सर्व गावातील महिलांना आर्थिक, मानसिक, व शारीरिक अन्याय अत्याचाराचा सामना करावा लागत आहे.

जुगाराच्या व व्यसनाच्या आहारी गेलेले इसम रुपये नसल्याने पत्नी ला मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र, पायातील चांदीच्या चैन व जोडवे नेवून विकत आहेत. आणि दारू, मटका, क्लब वर जाऊन बरबाद होऊन घरी येत आहेत. शेवटी काही नसेल तर घरातील अन्न धान्य विकून दारू पिऊन महिलांवर व लेकरा बाळांना मारून घरा बाहेर काढून देत आहेत. त्या मुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत.

व्यसनाधीन झालेल्या नवऱ्या च्या त्रासाला कंटाळून सर्व धर्मीय महिलांनी दि. 09,01,2026 शुक्रवारी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन बिटरगाव (बु) येथे धडक मोर्चा नेला होता. खुलेआम असलेली विनापरवाना देशी विदेशी दारू, मटका, जुगार तात्काळ बंद करून आमचे संसार वाचवा म्हणून ठाणेदार शिंदे साहेबांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. त्या सोबत ग्रामसभा ठराव पण जोडलेला आहे. जर पोलीस प्रशासनाने कार्यवाही करता येत नसेल तर आम्ही या पेक्षा तिर्व आंदोलन करणार असे संतप्त झालेल्या महिला बोलत होत्या.



