✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
अर्जदार शाम धुळे अध्यक्ष उमरखेड प्रेस क्लब, उमरखेड यांनी महागाव पोलीस स्टेशन येथे दिली लेखी तक्रार

महागांव :- पोलीस स्टेशन अतंर्गत हद्दीतील सुरू असलेले अवैध धंदे जुगार, मटका, रेती, गुटका, दारू इत्यादी काळे धंदे त्वरित बंद करणात यावे. यामुळे महागाव तालुक्यातील अनेक नागरीकांचे संसार उघडल्यावर पडले आहे. तसेच शाळा, कॉलेज मधील नवतरुण विद्यार्थी वाईट मार्गाला लागले आहे.

याची गंभीर दखल घेऊन महागांव तालुक्यातील अवैध धंदे त्वरित बंद करावे. अन्यथा उमरखेड प्रेस कलब भी पत्रकार संघटनेकडून महागांव तहसिल कार्यालया समोर दि. 25 जानेवारी 2026 रोजी तीव्र आंदोलन छेडन्यात येईल. यात आंदोलेनकत्यास जीवीत हानी झाल्यास संबंधीत प्रशासन जबाबदार राहील.

यावेळी उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघाचे अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यक्ष गजानन वानखेडे, सचिव सिध्दार्थ दिवेकर, कोषाध्यक्ष अशोक धुळे, प्रसिद्धीप्रमुख बबलू भालेराव, कुणाल श्रवले, सल्लागार प्रसेजीत दिवेकर, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे डॉ. अंबेजोगाईकर, अध्यक्ष किरण मुक्कावार, विजय कदम, राजेश कदम, मुजीबभाई लाला इत्यादी पत्रकार उपस्थित होते.





