✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
माहूर :- समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ एक दिवसीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गणेश कचकलवार राष्ट्रीय अध्यक्ष निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, उद्घाटक म्हणून श्री तानाजीभाऊ जाधव टायगर ग्रुप अध्यक्ष, तसेच श्री कॅप्टन परिमल फुलसुंगे, श्री एस पी राठोड, श्री प्रेममूर्ती नवनाथ लिमण, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार, शिवव्याख्याते – ह.भ. प. यशवंत महाराज फाले, महाकाल भक्त उज्जैन श्रीमहंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज (दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त),

न्यू होम मिनिस्टर प्रस्तुत क्रांतीनाना मळेगावकर इत्यादी प्रमुखांच्या उपस्थितीत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे माहूर तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले, तसेच समाधान कांबळे यांना अनेक स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



