✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड – पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत बाळदी येथे राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच गावातील व तांडा वस्तीमधील जिल्हा परिषद शाळेतही जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.

या जयंती मध्ये जिल्हा परिषद शाळेतील तसेच अंगणवाडीतील मुलींनी जिजाऊच्या वेशभूषात आपली आपली उपस्थिती दर्शवली.यामध्ये पहिल्या वर्गापासून ते चौथ्या वर्गापर्यंत च्या विद्यार्थ्यांनीसहभाग घेतला होता.जिजाऊ च्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बाळदी तांडा येथे जिजामातेच्या इतिहासावर काही मुलांची भाषणे झाली.

त्यांनी त्या भाषणातून जिजाऊ चा संपूर्ण इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे त्यांचे गावभर कौतुक केल्या जात आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांचे काही खेळाचे कार्यक्रम घेण्यात आले.तेव्हा यावेळी यशवंत सर,गायकवाड सर, दुधे मॅडम व इतर शिक्षक वृंद उपस्थित होता.

तसेच गावातील ग्रामपंचायत मध्ये सरपंच डॉ. भगवान बोरकर, सचिव डी. बी.सूर्यवंशी,माजी सरपंच प्रदीप शिरडकर, राजेश भोसले,शेषराव हटकर,रोजगार सेवक गणपतराव ठोके, ग्रा. प. कर्मचारी निरगुन मिराशे, किशोर दुधे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.



