✍️ करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)

ढाणकी- नगर पंचायत मध्ये सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, एम आय एम व भाजपात(ढाणकी शहर विकास आघाडी) सुरू असलेल्या धोबीपछाड खेळीत अखेर शिवसेना, काँग्रेस, एम आय एम (ढाणकी नगर विकास आघाडी) बाजी मारली आहे. अपक्ष मदतीने भाजपने बहुमताचा आकडा गाठलाही होता. पण शिव सेना शिंदे गट, काँग्रेस, एम आय एम, व शिवसेना (उबाठा)गट निर्माण करून नगर अध्यक्ष चे दोन मतदान वरून भाजपाच्या आघाडीला मागे टाकत चक्रे उलटी फिरवून भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेचा ढाणकी नगरपंचायत मध्ये गड राखला. अपक्ष नगरसेवकांना सोबत घेऊनही बहुमत सिद्ध करू न शकलेल्या भाजपसाठी मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे.
ढाणकी नगरपंचायत निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदावर शिव शिवसेना (उबाठा )चे सौ. अर्चना सुंदर कांता हे पदावर विराजमान होता च नगरपंचायत मध्ये जनरल बॉडी कोणाची होणार यावर राज्य पातळीवर राजकारण तापले होते.

14 जानेवारी बुधवार ला ढाणकी नगरपंचायत सभागृहात होणाऱ्या पहिल्या सभेत कोण बहुमत सिद्ध करतो याकडे लक्ष लागले होते. त्यानुसार (ढाणकी नगर विकास आगाडी) अज्ञातस्थळी असलेले सर्व नगरसेवक दुपारी नगरपंच्यात येथे दाखल झाले. त्यानंतर तासाभराच्या चर्चेनंतर सिवकृत नगर सेवक म्हणून शिवसेना शिंदे गटाचे ढाणकी शहर अध्यक्ष संजय सल्लेवाड यांची निवड करण्यात आली व नगरसेवकांच्या व नगर अध्यक्ष यांच्या दोन बहुमताच्या जोरावर शिवसेनेचे दत्त दिगंबर वानखेडे यांची उपनगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी भाजप ने दोन अपक्ष नगर सेवक ला घेऊन ढाणकी शहर विकास आघाडी करून सुद्धा बहुमत सिद्ध करू शकले नसून विरोधी पक्ष म्हणून सभागृह मध्ये बसणार.पण शहर विकास आघाडी यांनी रोहित सरलाबाई विष्णूदास वर्मा जिल्हाध्यक्ष, भाजयुमो पुसद यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली.




