🚨शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत करावी..!
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
उमरखेड – तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कुरळी येथील शेतकरी संदीप अंशीराम आढागळे वय 37 वर्ष यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी शेतीवरील कर्ज व सततची नापिकी या कारणामुळे सकाळी साडे दहा वाजता शेतातील फवारणी करण्यासाठी आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले.

ही बाब मोठ्या भावाच्या लक्षात येताच त्यांनी संदीप यांना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी चार वाजता उपचार दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कर्जबाजारी शेतकरी संदीप यांच्या पश्चात विधवा आई एक अविवाहित बहीण पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा बराच मोठा परिवार आहे.

आपल्या 7 एकर शेतीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अडीच लाख रुपये कर्जामुळे संदीप हा नेहमीच चिंतेत असायचा, त्याचबरोबर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले त्याचबरोबर शेतीचे सुद्धा खूप नुकसान झाले शेती पण खरडून गेली, त्यामुळे तो अधिकच चिंतेत राहू लागला परिणामी संदीप यांनी आपला जीव कर्जबाजाराला कंटाळून गमावला.

तरी या भागातील वाढती शेतकरी आत्महत्या लक्षात घेता शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत करून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता परिसरातील नागरिकाकडून जोर धरत आहे.





