
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर ( कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – शहरातील आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आनंदात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटना शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना उपस्थित आमच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यावेळी भदंत कीर्ती बोधी यांनी बहुजन राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती सांगून सर्वांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर अध्यक्ष सम्यक बुद्ध विहार समिती, शहराध्यक्ष भीम टायगर सेना यांनी केले. यावेळी रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई इंगोले, आनंदाबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले, कांचन दिवेकर, शांताबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, उज्वला धबाले, आशाबाई दिवेकर, भारताबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, यशोधरा धबाले, यशोदा दिवेकर इत्यादी अनेक बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.






