✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी) मो. 8975723211
उमरखेड दिनांक 23 फेब्रुवारी 2026 संत गाडगेबाबा यांची 150 वी जयंती उमरखेड तालुक्यातील नागापूर (रूपाळा) ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी करण्यात आली.

संत गाडगे गाडगेबाबा हे एक थोर समाज सुधारक होते, गाडगेबाबा कीर्तनकार सुद्धा होते. त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजातील अंधश्रद्धा. अनिष्ट प्रथा, व्यसनमुक्ती, जातिभेद याबद्दल आयुष्यभर समाजाचे प्रबोधन केले, ते आपल्या कीर्तनात नेहमी म्हणायचे स्वच्छता, शिक्षण, आणि माणुसकी हाच खरा धर्म आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच सौ सुलावती राजाराम डुकरे , मोहसीन पठाण (सा. कार्यकर्ते),सदस्य माधव चंदेवाड आशा सेविका कांचन राठोड, जोशना राठोड , मेहबूब पठाण (ग्रा. कर्मचारी) ग्रा. सदस्य तथा पत्रकार राहुल पाईकराव इत्यादी उपस्थित होते.





