✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी) मो.8975723211

आज 13 मार्च समता सैनिक दल स्थापना दिन 13 मार्च 1927 समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. समता सैनिक दलाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.

महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी दलित समाजाच्या संरक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ही निळी फौज स्थापन करण्यात आली. हे दल सामाजिक समानता ,मानवी प्रतिष्ठा, आणि शोषित वर्गाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आजही कार्यरत आहे. समजा सैनिक दलाचा मुख्य मंत्र ,”शिक्षित व्हा ,संघटीत व्हा ,संघर्ष करा “हा आहे.यामुळे समाजातील चळवळ जिवंत ठेवता येते. तसेच सामाजिक सलोखा टिकवणे, सामाजिक विषमता नष्ट करणे, शोषित पीडित समाजाची संरक्षण करणे, आणि समतेचा प्रसार करणे हा मुख्य उद्देश आहे.

आजच्या युवा पिढीने समता सैनिक दलाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आंबेडकर चळवळीला गती देण्याचा प्रयत्न करता येईल.







