🎉[इफ्तार मेजवानीत सामाजिक सलोख्याचा संदेश !]

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड पवित्र रमजान महिन्यानिमित्त जमाअते इस्लामी हिंद, शाखा उमरखेड यांच्या वतीने शहरातील अनंतराव देवसरकर मंगल कार्यालय, ढाणकी रोड येथे इफ्तार मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला विविध धर्म, जाती व सामाजिक संघटनांचे मान्यवर उपस्थित राहून सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश दिला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इस्लामिक विचारवंत जनाब नौशाद उस्मान (छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, धार्मिक माणूस कधी कट्टर पंथीय नसतो. समाजात अधार्मिकता वाढवण्याचे काम काही राजकीय लोकांकडून केले जाते. पृथ्वीवरील सर्व धर्म, त्यांच्या रूढी, परंपरा व चालीरीती या आदरणीय असून प्रत्येक धर्माचा आदर करणे आवश्यक आहे.ते पुढे म्हणाले की, पूर्वीचे लोक माणसं वाचत होते आणि माणूस ओळखत होते, त्यामुळे समाजात माणुसकी टिकून होती. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसं जवळ आली असली तरी माणुसकी मात्र दूर जाताना दिसत आहे.


रमजान महिन्यातील रोजाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, रोजा हा केवळ उपवास नसून तो आत्मशुद्धी, संयम आणि समाजात एकोपा निर्माण करणारी चळवळ आहे. जगातील अनेक समाजांमध्ये उपवासाची परंपरा आहे. माणसाला माणसाशी जोडणारी संस्कृती म्हणजेच रोजा किंवा उपवास होय. रोजा उपवास ईश्वराचे सानिध्य प्राप्त करण्याचे साधन होय ,रमजान चारित्र संवर्धनाचा महिना आहे ,उपवासात मानवी विचार प्रवण होतात .नैतीक बळ म्हणजे इशपारायणता असे विचार नौशाद यांनी व्यक्त केले.उमरखेडसारख्या शहरात विविध धर्मीय नागरिक , राजकीय व्यक्ती , सर्व क्षेत्रातील मान्यवर एकत्र येतात हा उमरखेड पॅटर्न देशभर राबविल्या जाण्याची गरज असल्याचे नौशाद म्हणाले माणसाला माणूस जोडला तर समाज जोडेल, समाज जोडला तर गाव जोडेल आणि गाव जोडले तर राष्ट्र मजबूत होईल, असा संदेशही त्यांनी दिला.

या इफ्तार मेजवानी कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध जाती-धर्माचे नागरिक, डॉक्टर असोसिएशन, पोलीस प्रशासन, पत्रकार संघटना, वृक्ष संवर्धन समिती तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला. सात वेगवेगळ्या भाषांत इस्लामविषयी गैरसमज दूर करण्यासाठी इस्लामिक इन्फाॅर्मेशन सेंटर (IIC) च्या 1800 572 3000 या टोलफ्री नंबरचा त्यांनी परिचयदेखील यावेळी करून दिला. शेवटी जमाअतचे स्थानिक अध्यक्ष ज़हिरुद्दीन क़ाज़ी यांनी आभार मानले, तर फिरोज़ अंसारी यांनी सुत्रसंचलन केले.

या कार्यक्रमात इफ्तारच्या फराळासहीत मोफत मराठी साहित्याचीही मेजवाणीही भेट म्हणून श्रोत्यांना दिली. कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध जाती-धर्माचे नागरिक, डॉक्टर असोसिएशन, पोलीस प्रशासन, पत्रकार संघटना, वृक्ष संवर्धन समिती तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





