✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक ५ मे) तालुक्यातील जंगल भागामध्ये असलेले आडद गावामध्ये जल्वंत आंबेडकर वादाचा पुरस्कार करणारे, लढाऊ वैचारिक व आक्रमक असलेले अराजकीय सामाजिक संघटन म्हणजे भीम टायगर सेना या शाखा फलकाचे उद्घाटन संविधान रक्षक फायर ब्रँड वक्ते दादासाहेब शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर लगेच दादासाहेब शेळके यांनी भारतीय संविधान व भिम टायगर सेनेबद्दल अमूल्य उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

शेळके म्हणाले की, माणसं जोडण्याची काम म्हणजे भिम टायगर सेना, अन्याय अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या आवाज म्हणजे भीम टायगर सेना, संविधान विरोधी कृत्य करणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढणारा म्हणजे भीम टायगर सेना. एसी, एसटी, ओबीसी, समाजाला एकत्र आणण्याचे काम भिम टायगर सेना करत असते असे प्रतिपादन दादासाहेब शेळके (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष) यांनी आडद गावामध्ये केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शामभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष, कैलास कदम तालुका अध्यक्ष, सिध्दार्थ दिवेकर शहराध्यक्ष, भिमशाहिर गौतम शिंगणकर, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाखाध्यक्ष अमोल खडसे, उपाध्यक्ष नामदेव लोखंडे, सचिव अनिल भालेराव, कोषाध्यक्ष दयानंद कोल्हे,सहसचिव सदानंद कोल्हे, इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी अथांग परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे आयोजन भिम टायगर सेना शाखा आडद यांनी केले होते.





