✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
तालुका प्रतिनिधी ✍️ समाधान कांबळे

🌐 जल_ही_जिवन_है_जल_है_तो_कल_है 🌐
श्रीक्षेत्र माहूर :- (दिनांक 05 मे) ऊन्हाची तीव्रता लक्षात घेऊन स्व. आमदार प्रदीप जी नाईक साहेब यांच्या स्मरणार्थ माहूर शहर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, टी पॉईंट व बसस्थानक परिसरात प्रवाशी, नागरिकांसाठी व तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर या तालुक्याच्या ठिकानी ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांना व भाविकांची तहान शमवण्या साठी थंड पाण्याच्या पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.


जेष्ठ नागरिक मोहन पवार यांच्या हस्ते फीत कापून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज काका जाधव यांच्याहस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला.


यावेळी माज्या समवेत,सभापती विजय कामटकर,सभापती प्रतिनिधी माजी नगरसेवक रफीक सौदागर,नगरसेविका प्रतिनिधी इरफान सय्यद,सभापती प्रतिनिधी रणधीर पाटील, नगरसेविका प्रतिनिधी निसार कुरेशी,नगरसेवक प्रतिनिधी सुमित खडसे,राजू सौंदलकर,विक्रम राठोड, अफसर आली,शेख आरिफ, देवी भाऊ पेंटर, जावेद दोसानी,आकाश राठोड,विकास राठोड, यांची उपस्थिती होती. !







