
(2 दिवसात कोणतीही कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार…!)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड:- (दिनांक 5 मे) तालुक्यातील गो सी गावंडे महाविद्यालय यांच्या संस्था अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, कार्यक्रमाचे आयोजक यांनी भारताचे संविधान प्रत मध्ये स्वतःचे फोटो टाकून संविधानाचे जाणून बुजून विटंबना/अपमान केल्याबद्दल यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी.

अशी लेखी तक्रार भीम टायगर सेना उमरखेड – यवतमाळ तक्रारकर्ते शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ), कैलास कदम (तालुकाध्यक्ष उमरखेड), सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष उमरखेड) यांनी केली आहे.गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय येथे दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी “सन्मान चौथ्या स्तंभाचा” आत्मदर्पण प्रकाशन सोहळा.

या कार्यक्रमा मध्ये उमरखेड शहर व तालुक्यातील पत्रकार संघाचा भारतीय संविधान प्रत देऊन सन्मानित करण्यात आले होते.पण गो सी गावंडे महाविद्यालय यांनी बनवलेल्या भारतीय संविधानाच्या प्रत मध्ये सुरुवातीला संस्था नाव, संस्था अध्यक्ष व सचिव यांचे फोटो टाकून भारतीय संविधान प्रत वाटप करण्यात आली.

पण भारताचे संविधान प्रत मध्ये व्यक्तिगत जाणून-बुजून छेडछाड करून त्याला अपमानित व त्याची विटंबना करण्याचे काम गावंडे महाविद्यालय यांच्या संस्था अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, कार्यक्रमाचे आयोजक यांनी केले असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी.

सदर कारवाई 2 दिवसात न झाल्यास भिम टायगर सेना सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल.याची नोंद असावी.
असा इशाराही तक्रार निवेदनात देण्यात आला.यावेळी तक्रारकर्ते शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ), कैलास कदम (तालुकाध्यक्ष उमरखेड), सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष उमरखेड)




