
(यवतमाळ जिल्हा पोलीसांची कारवाई)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 1 मे) पोलीस ठाणे उमरखेड हद्दीतील धोकादायक व्यक्ती नामे विजय गणेश भिमेवार वय 24 वर्ष रा. शिवाजीवार्ड उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे सन 2020 ते सन 2025 पावेतो.

विविध कलमान्वये सार्वजनिक ठिकाणी हत्यार बाळगुन मारामारी करणे, धार्मीक भावना दुखावुन जातीय तेढ निर्माण करणे, हत्याराचा धाक दाखवुन अश्लिल शिवीगाळ करुन धमकी देणे, दंगा करुन मारहाण करुन नुकसान करणे, दुखापत करुन जबरी चोरी करणे, हत्याराचा धाक दाखवुन मारहाण करणे, अनुसुचीत जाती जमातीच्या स्त्रिचा विनयभंग व मारहान करुन जबरी चोरी करणे, कट रचुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन अनुसुचीत जाती जमातीच्या लोकांवर अत्याचार करणे,

असे विविध स्वरुपाचे गंभिर गुन्हे दाखल असल्याने ठाणेदार पोलीस स्टेशन उमरखेड यांनी त्यास स्थानबध्द करणे करीता MPDA कायद्यान्वये प्रस्ताव तयार करुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड व मा. पोलीस अधिक्षक साहेब, उमरखेड यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सादर केला होता.

मा. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी सदर प्रस्तावास मान्यता देवुन दिनांक 28/04/2025 रोजी त्याचे स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असल्याने व त्यास यापुर्वीच पो.उप.नि. धरणे पो.स्टे. उमरखेड यांचेकडे तपासावरील गुन्हा अपराध क्र. 216/2025 कलम 3/25,3/25(8), 27 आर्म अॅक्ट मध्ये वि. प्रथम श्रेणी न्यायालय उमरखेड यांचे आदेशाने विजय गणेश भिमेवार वय 24 वर्ष रा. शिवाजीवार्ड उमरखेह हा न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृह, वाशिम येथे दाखल आहे.

त्यावरुन धोकादायक व्यक्ती इसम नामे विजय गणेश भिमेवार वय 24 वर्ष रा. शिवाजीवार्ड उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यास सदर आदेश दिनांक 30/04/2025 रोजी तामील करुन जिल्हा कारागृह, वाशिम येथे स्थानबध्द करण्यात आले.

सदरची कार्यवाही ही श्री कुमार चिंता, पोलीस अधिक्षक यवतमाळ, श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, श्री हनुमंत गायकवाड, उप. वि. पोलीस अधिकारी कार्यालय उमरखेड मार्गदर्शनात श्री सतिष चौरे, पोलीस निरीक्षक,

स्था.गु.शा. यवतमाळ, श्री धनराज हाके स.पो.नि. स्था.गु.शा. यवतमाळ, श्री. शंकर चिं. पांचाळ, पोलीस निरीक्षक, सागर इंगळे, पोलीस उपनिरीक्षक डी. बी. पथक, पोहवा. पतंगे, पोहवा पवार, पो.कॉ. जफर पोलीस स्टेशन उमरखेड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.




