(जळगाव येथे झाडीपट्टीच्या नाटककाराचा सन्मान)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466

गडचिरोली (दिनांक 7 मे) जळगाव येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठान या मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या कर्मविरांना राज्यस्तरीय समाज चिंतामणी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. व मान्यवरांचे हस्ते त्यांचा गौरव करण्यात येतो.

महाराष्ट्रातील साहित्य व सांस्कृतीक क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता झाडीपट्टीतील नाट्य सेवेबद्दल तसेच साहित्य सेवेबद्दल यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांची निवड करण्यात आल्याचे समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी निवड पत्राद्वारे कळविले असून दि. ११ मे, रविवारी , सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील अल्पबचत भवन सभागृहात होणाऱ्या सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसभेचे सदस्य मा. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांचे शुभहस्ते तसेच समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. आर. डी. कोळी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, सन्मानपत्र असे आहे.

कार्यक्रमास मा. मिनल करमवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जळगाव, तसेच डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक, जळगाव, ज्ञानेश्वर ढेरे, म.न.पा.आयुक्त जळगाव, संस्थेचे उपाध्यक्ष जयसिंग सोनवणे, व सचिव शालिनी सैंदाणे हे उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके, महापूजा, या महानाट्यांना विविध संस्थांतर्फे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा.यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, रमेश निखारे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), प्रा. संतोष मेशराम, प्रा. संजय लेनगुरे, मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक), व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.





