
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक ७ मे) उमरखेड शहरातील नगरपरिषद च्या हद्दीतील शहराच्या चारही बाजूच्या अवैधरित्या नागरिकांनी बसवलेले दुकाने नगरपालिकेने कायमस्वरूपी हटविण्यास सुरुवात केली आहे.


पंचायत समिती महागाव रोड वरील बसवलेले अवैध दुकाने आज काढण्याचा सुरुवात झाली आहे. तसेच पुसद ते ढाणकी रोड पर्यंत सर्व अतिक्रमण दुकाने काढण्यात येणार आहेत.

शहरामध्ये सर्वत्र नगरपालिका मार्फत नाल्याचे रुंदीकरण बांधकाम सुरू केली आहे. त्यामुळे रस्त्यावर बसलेल्या सर्व दुकाने कायमस्वरूपी काढण्याकरिता मुख्याधिकारी महेशकुमार जामनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अतिक्रमण काढण्यात आले आहे.

अतिक्रमण काढण्यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चौकट:- उमरखेड नगरपालिकेने कोणतीही सूचना किंवा नोटीस अतिक्रमण दुकान धारकांना देण्यात आली नाही. (अतिक्रमण धारक दुकानदार)






