
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
महागाव (दि.28 ऑगस्ट) :- मानवी नात्यांना काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना महागाव तालुक्यातील माळकिन्ही शेत शिवारात 26 ऑगस्ट रोजी घडली. शेतातील किरकोळ वादातून माळकिन्ही येथील एका भावाने सख्या भावाचाच खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, माळकिनी येथील प्रदीप अशोक रिंगे (वय ३०) हा आपल्या शेतात काम करीत असतांना त्याचा मोठा भाऊ निलेश अशोक रिंगे (वय ३५) याच्याशी शेतातील मुगाच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून वाद झाला. वाद चिघळताच प्रदीपने मानसिक तणावातून बांबूची काठी उचलून आपल्या सख्या भावांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जबर तडाखे दिले.


या गंभीर मारहाणीमुळे निलेश रक्तबंभाळ होऊन अतिशय वेदना झाल्याने त्याचा जागेवरच कोसळुन मृत्यू झाल्याची घटना घडली. सख्ख्या भावाने आपल्या भावाचा शेतात खून केल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.



