
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 29 ऑगस्ट) अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवास वन हक्क सामूहिक व न हक्क व्यवस्थापन समिती सोनदाभी उमरखेड तालुक्यातील बंदी भागामध्ये सोनदाभी या गावी वन हक्क प्राप्त 527 या गटांमध्ये फळबाग लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

या परिसरामध्ये 12 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.यावेळी समितीचे अध्यक्ष मारुती शेषराव पिळवंड, उपाध्यक्ष सुंदर सिंग करपारबडे, सचिव अशोक दत्तराव घोगेवाड, कोषाध्यक्ष सिंधुबाई देवराव ठाकरे,लालू लक्ष्मण बदावन सध्यक्ष सौ. दुर्गा देवानंद वाडेकर, सदस्य सौ. कांताबाई दत्तराव पिठलेवाड,सौ. कल्पना श्रावण वासेवाड, राजेश दारूसिंग बसी, नूरसिंग, मेहेरबान जाट, सौ. रुक्मीनाबाई अजय मुरमुरे, रामा चंपत डुकरे, उत्तम दशरथ काळबांडे व रोजगार हमी रोज मजूर उपस्थित होते.


रोजगार सेवक सुभाष देवकर व गावातील सामाजिक कार्यकर्ते फळबाग लागवड करण्यात आली माजी पंचायत समिती सदस्य धनराज भाऊ तगरे व देवानंद साहेबराव वाडेकर बालसिंग साबळे गावातील बचत गटाच्या महिला रोज मजूर फळबाग लागवड करण्यात एकजुटीने रोजगार हमी कामाला सुरुवात आली.



