🔵 नगर पालिकेचा आंधळा कारभार उघड – नाल्याशेजारी जमिनींचे एन.ए.

🔵 नागरिकांशी मुख्याधिकारी यांची आरेरावी..!
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड :- (दि.28 ऑगस्ट) दिनांक १५ -१६ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने उमरखेड शहराचा पूर्व भाग अक्षरशः जलमय झाला. फुलारी लेआउट, रहीम नगर, फातिमा कॉलनी, मुर्तीजा नगर, सवेरा कॉलनी या वस्त्यांमध्ये घराघरात पाणी शिरले. गरीब कुटुंबांचे धान्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य वाहून गेले. काहींची घरेच पाण्याच्या घाणीत उद्ध्वस्त झाली.

लेआउट मंजुरीतील थेट भ्रष्टाचार भूमापन क्र. ६३, ६४, ६५/१, ६६ या मंजूर लेआउटमध्ये रिटेनिंग वॉल बांधणे बंधनकारक होते. मात्र ते बांधले गेले नाही. तरीसुद्धा नगरपालिकेने नियम बाह्म मंजुरी दिली.
याच भ्रष्टाचाराचा फटका गरीब नागरिकांना बसला आहे. असा सवाल मोहसीन राज यांनी केला आहे.

🔵नाल्याच्या अडचणी – नागरिकांचे जीवन धोक्यातनाल्याची रुंदी अपुरी, त्यामुळे पाणी वाहून नेण्याची क्षमता नाही ,गाळ व अडथळ्यांनी नाल्याचा प्रवाह अडतो ,तटरक्षक भिंतींचा अभाव – घरात पाणी थेट घुसते ,पावसाळी निचऱ्याची कोणतीही वैज्ञानिक योजना नाही.

नागरिकांचा मागण्या – रहिवाशांनी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात मागण्या लेंडी नाल्याचे तातडीने रुंदीकरण व खोलीकरण करावे , दोन्ही बाजूंना मजबूत तटरक्षक भिंती उभाराव्यात , वैज्ञानिक पद्धतीने पाण्याचा निचरा मार्ग आखून रेन वॉटर हार्वेस्टिंगची जोडणी करावी ,मंजूर लेआउटमध्ये नियमभंग करून मंजुरी देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर व लेआउट मालकावर कडक कारवाई करावी.


“नागरिकांचा प्रश्न – भ्रष्टाचाराच्या खाईत आम्ही का बुडायचे ?” आज नगरपालिकेच्या भ्रष्टाचारामुळे व आंधळ्या कारभारामुळे गरीबांच्या घरात पाणी घुसते आहे. तर मुख्याधिकारी नागरिकांचे समाधान करण्या ऐवजी तुमची नोटरी आहे. दहा वर्ष टॅक्स माफ करतो, नात्यात कचरा तुम्हीच टाकता, सरकारी जागेवरील घरे खाली करा अश्या उद्धट भाषेत आरेरावी केली. संतप्त नागरिकांनी तात्काळ उपाययोजना केली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला.



