
(बाळदी ग्रामपंचायत यांचे दुर्लक्ष; गावातील नागरिक आजाराने त्रस्त)(प्रहार चे सर्कल प्रमुख व तालुका सदस्य यांनी बाळदी ग्रामपंचायतला दिले निवेदन)
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड तालुक्यातील बाळदी गावाच्या आजूबाजूला साचलेले पाणी तसेच गावातील ग्रामपंचायतने नियमितपणे नाल्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई न केल्यामुळे डासाची उत्पत्ती खूप प्रमाणात वाढत असल्यामुळे डेंगू, व, मलेरिया ताप हा विषाणूजन्य रोग आहे. ताप डेंगू (DE NU) विषाणूमुळे होतो. व ईडीस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे प्रसारित होतो.सध्या परिस्थितीला बाळदी गावामध्ये साथ रोगासारखे आजार वाढले आहेत.

उदा. तपासोबत थंडी वाजून हलकी ताप, खूप ताप येणे, तोंड कडू पडणे, तसेच घसा, डोके, आणि सांधे दुखणे अशी लक्षणे आढळतात.त्यामुळे रुग्णाला अशक्तपणा जाणवत आहे. काही खावेसे वाटत नाही त्या प्रकारची लक्षणे खूप प्रमाणात गावामध्ये सध्या परिस्थिती तोला चालू आहे. त्यामुळे बाळदी गावात प्रत्येक वार्डात फॉगिंग मशीनद्वारे लवकरात लवकर फवारणी करण्यात यावी.

यावेळी निवेदन देताना प्रवीण इंगळे (प्रहार चे सर्कल प्रमुख व तालुका सदस्य), प्रफुल वानखेडे,संतोष हरण, शंकर हरण, नितीन राठोड, गजानन राठोड आदी गावातील मंडळी उपस्थित होती.



