
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466
ढाणकी, महागाव , फुलसावंगी,धनोडा माहुर बस सेवा सुरु करा अशी मागणी भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय प्रचारक इंजिनीयर विद्वानभाऊ केवटे , यांनी उमरखेड आगार व्यवस्थापक प्रमोदीनी किनाके यांनी निवेदनातून केली.तसेच प्रवाशांची गैरसोय होणार याची दक्षता घ्यावी,या रस्त्यावर ढाणकी वरुन माहुर एकही बस नाही,त्यामुळे भाविक भक्ताना, प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. कारण काही दिवसात नवरात्र उत्सव सुरु आहेत.तसेच माहूर हे तीर्थस्थळ,साडेतीन शक्तीपीठ पैकी एक शक्ती पिठ असल्यामुळे सर्व जातीय धर्मांतील भक्तमंडळी येथे ये -जा करतात.
भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रिय आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवेदन देऊन चर्चा केली.

लवकरात लवकर बस सेवा सुरु करावी अशी उमरखेड आगार व्यवस्थापका कडे मागणी केली. ह्या संविधानिक मागण्या पूर्ण न झाल्यास संबंधित मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी सूचना देखील देण्यात आली.

भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रिय आदिवासी एकता परिषदेचे,सर्व पदाधिकारी, गणपतराव गव्हाळे, शेख जब्बार,अमोल पाटील मिलींद चिकाटे साहेब, प्रकाश कांबळे, विनोद बनसोडे,कृष्णा पाटील, शिवाजी चंद्रवंशी, पुंडलिक तलवारे,विजय गंगाळे,शेख सफदर, मुजाहिदभाई, अनिल लहाने,दिनेश पवार ,समाधान पंडागळे, अंबादास राणे, राजदीप बरडे, साहिल रोकडे, अंकुश कदम, संतोष धुपे, यांसह भारत मुक्ती मोर्चाचे सर्व पदाधिकारी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत मुक्ती मोर्चा ने केलेल्या जनहिताच्या ह्या मागणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




