
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 20 सप्टेंबर) शहरामध्ये मागील अनेक दिवसांपासून मोकाट जनावरे तसेच मोकाट रोगीट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. हे मोकाट जनावरे प्रत्येक वार्डामध्ये दहा ते पंधरा या संख्येत हे जनावरे फिरत असतात.

अनेक नागरिकांच्या अंगावर धावून सुद्धा जात असतात व त्यांना नुकसान पोहोचेल अशी परिस्थिती निर्माण होते. तसेच शहरात रोगीट पिसाळलेले कुत्र्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. या रोगीत कुत्र्यामुळे अनेक आजारांना नागरिकांना तोंड द्यावे लागते तसेच लहान बालक, शाळकरी मुले आणि वयवृद्ध नागरिकांवर जास्त प्रमाणात मोकाट कुत्रे हल्ला करत असताना दिसून येत आहे.

म्हणून नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शहरात फिरत असणारे मोकाट जनावरे आणि रोगिट व पिसाळलेले कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी उमरखेड वासियांनी जनहित 24 न्यूज चॅनल च्या कार्यकारी संपादक सिद्धार्थ दिवेकर यांना माहिती दिली आहे.



