
💥(विकास कामात भ्रष्टाचाराचा ग्रामस्थांचा आरोप)
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466
उमरखेड तालुक्यातील धानोरा ( सा) ग्रामपंचायत मधील दलित वस्ती सुधार योजनेसह १५ वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या कामांमध्ये गंभीर अनियमितता झाली आहे. अनेक कामे अर्धवट असून त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अर्धवट रस्ते नाल्या फ्लेवर ब्लॉक व इतर विकास कामावरील निधी हडपण्यासंदर्भात तक्रार देत ग्रामसेवकांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी बीडिओकडे 15 सप्टेंबर रोजी केली आहे.

धानोऱ्यातील दिलीप संभाजी काळे व केशवराव मारोतराव तिडके यांनी ही तक्रार केली आहे . यांनी उमरखेड पंचायत समितीच्या बीडिओकडे या संदर्भात तक्रार दिली आहे ग्रामसेवकांनी स्वतः ता ठेकेदारी पद्धत अवलंबून सर्व विकासकामे केल्याचा तक्रारीत आरोप आहे मात्र ही कामे केवळ अर्धवट राहिली असून झालेल्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे.


ग्राम विकासासाठी आलेल्या लाखोच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोपही केला आहे संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या गैर व्यवहाराची सखोल चौकशी गावकऱ्या समक्ष करून दोषीवर कठोर कारवाई करावी अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल इशाराही अर्जदारांनी दिला आहे या तक्रारीमुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली असून गटविकास अधिकारी चौकशी सुरू करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



