
✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी)
नाशिक – दिनांक 20 मार्च 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह हा सार्वजनिक तळ्याचे पाणी वापरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी केलेला ऐतिहासिक “सत्याग्रह,” होता. माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी हा लढा होता.

या आंदोलनामुळे दलितांना मानवी हक्क आणि सामाजिक समतेचा लढा मिळाला. 20 मार्च हा दिवस सामाजिक ,”सक्षमीकरण” दिन म्हणून पाळला जातो. या लढ्यामुळे मानवी जीवनाच्या हक्काचा पाया रचण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन तळ्याचे पाणी प्राशन केले आणि अन्यायाची प्रथा तोडली. हा सत्याग्रह दलिताच्या मुक्तिसंग्रामातील पहिला आणि सर्वात मोठा टप्पा मानला जातो.पाणी हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी लढणं हीच खरी मानवता आहे.

येथे स्वाभिमान आणि जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे सत्याग्रहातून दाखवून दिले. जिथे समता नाही तिथे स्वातंत्र अपूर्ण आहे. अधिकार मागून मिळत नसतील तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो. हे बाबासाहेबांनी दाखवून दिले. त्यांची ही शिकवण आपण लक्षात ठेवायला हवी.





