
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड – प्रत्येक गावात अंत्यकरणासाठी स्मशानभूमीच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु उमरखेड तालुक्यातील नावाजलेल्या बाळदी गावात आत्तापर्यंत स्मशानभूमीत दहन शेड नव्हते त्यामुळे मृतदेहालाही यातना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र होते.तेव्हा नागरिकांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करून अंत्यसंस्कार करावा लागत होता.

2021 मध्ये यासाठी ग्रामपंचायतने जागेची मागणी केली होती.2022 मध्ये संबंधित विषयाचे अहवाल तलाठी, वनविभाग, आरोग्य विभाग यांचे अहवाल मागून शासनाकडे दिले होते.तेव्हा 2023 मध्ये मे महिन्यात शासनाकडून मोजणी करण्यात आली. 2024 मध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून 2025 मध्ये जागेचे सर्व मोजमाप करून ग्रामपंचायतकडे सुपूर्त केले. व लगेच डिसेंबर मध्ये 15 वा वित्त आयोगातून त्या जागेवर जाळी कामाला सुरुवात करून ते काम पूर्ण केले.

याआधी काही संघटनेने निवेदन सुद्धा दिले होते.त्यानंतर आज दि. 20 मार्च 2026 रोजी गावातील सरपंच डॉ. भगवान बोरकर यांच्या हस्ते दहन शेडच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी गावातील सरपंच डॉ. भगवान बोरकर,उपसरपंच अंकुश मिराशे,माजी सरपंच प्रदीप शिरडकर,माजी उपसरपंच अरविंद हरण,माजी उपसरपंच साहेबराव पाटील मिराशे,सोसायटी अध्यक्ष भाऊराव वटाणे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल बोंद्रे,कोतवाल शामराव पोटे,रोजगार सेवक गणपत ठोके, निर्गुण मिराशे ज्येष्ठ नागरिक संभाजी चिरडे, किशोर दुधे, देवबन गोस्वामी, बळीराम वानखेडे,अनिल चव्हाण, विनोद टिपरे,प्रवीण इंगळे,संजय बलखंडे, अतिश वटाणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.





