
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड – पोलीस अधिक्षक सो. यांचे आदेशान्वये पोलीस स्टेशन उमरखेड येथे नवीन दोन बुलेरो वाहन असे एकुण तिन बुलेरो वाहन दिले आहे. सदर वाहनांचे उद्घाटन मा. आमदार किसनराव वानखेडे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड हनुमंत गायकवाड साहेब यांचे हस्ते पूजन करण्यात आले.

रॉईट कंट्रोल व्हॅन मधिल उपलब्ध सुविधा –
1) सदर व्हॅनमध्ये चारही बाजूंनी उच्च दर्जाचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले असून ते मा. पोलीस अधिक्षक कार्यालयाशी थेट जोडलेले आहेत.2) सदर वाहनाच्या मध्यमातुन पोलीस अधिकारी गाडीतूनच बंदोबस्ताचे निरीक्षण व नियंत्रण प्रभावीपणे करु शकतात,3) रात्रीच्या वेळी देखील स्पष्ट निरीक्षण करता यावे यासाठी वाहनात चारही बाजूंनी फोकस, कॅमेऱ्याची सुविधा उपलब्ध आहे.4) वाहनामध्ये कार्ड, मेमरी, सुविधा उपलब्ध असुन त्यामुळे वरीष्ठांना वाहनाचे लोकेशन व हालचालींबाबत माहिती तात्काळ प्राप्त होउ शकेल.5) सदर रॉईट कंट्रोल व्हॅनमध्ये वायरलेस सेटची सुविधा उपलब्ध असून त्याव्दारे सतत संपर्क व समन्वय राखणे सुलभ होते.

बोलेरो व्हॅन
1) पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच विविध शासकिय कर्तव्य पार पाडताना प्रभावी पेट्रोंलींग करण्यासाठी सदर वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे.2) कोणतीही घटना घडल्यास घटनास्थळी तात्काळ प्रतिसाद देउन नागरिकांच्या जिवीत व मालमत्तेची हानी कमीत-कमी ठेवणे तसेच अनुचित प्रकार घटल्यास त्वरीत मदत पुरविणे सुलभ होणार आहे.3) डायल- 112 सेवेंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींना रात्री-दिवसा कमीत-कमी वेळेत प्रतिसाद देता यावा यासाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.4) उमरखेड शहर, उपनगर, तसेच ग्रामीण भागात चोरी, घटफोडी, माटारसायकल चोरी, आदी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जास्तीत-जास्त पेट्रोलींग करण्यास मदत होईल.5) सण-उत्सव, निवडणूक बंदोबस्त, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचने शक्य होणार आहे. 6) पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीतून जाणाऱ्या नागपूर-तूळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील चिल्ली घाट, सुकळी ब्रिज, पैनगंगा नदी परिसर व मालेगाव भागात अपघातांच्या घटनांवर तातडीने मदत व बचाव कार्य करण्यासाठी सदर वाहनांचा उपयोग होणार आहे. 7) रात्रगस्त अधिक परिणामकारकपणे राबविणे तसेच शहर व उपनगर भागात नियमित व सुयोग्य पेट्रोंलींग करण्यासाठी वाहनांचा वापर करण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे विविध अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज रॉईट कंट्रोल व्हॅन तसेच उपलब्ध झालेल्या तीन नवीन बोलेरो वाहनांच्या माध्यमातून आगामी काळात कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त अधिक प्रभावीपणे हाताळणे शक्य होणार आहे. तसेच उमरखेड शहर व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नियमित व परिणामकारक पेट्रोलींग होणार.





