(राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी नागपुरात जनजागृती अभियान)

✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
नागपूर (दिनांक 24 जानेवारी) राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मुले व युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि समस्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, असे आवाहन हितेश डोर्लीकर यांनी आज केले.

राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान “नाग स्वराज फाऊंडेशन” द्वारा आयोजित आणि कामयाब फाऊंडेशन व हर दिन होंगे कामयाब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन हितेश डोर्लीकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

नाग स्वराज फाऊंडेशन या सामाजिक संस्थे द्वारा गेल्या वर्षा 2010 पासून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे.या अभियांनाद्वारे कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलण्याचे कार्य ही संस्था करीत आहे.

नागपूर आणि विदर्भ सर्व शहरातील उद्याने, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले, फाटलेले, कुजलेले कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलते.26 जानेवारी व 15 ऑगष्ट या दिवशी लहान मुले, युवक-युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय ध्वज‘ तिरंगा’ घेवून फिरतात व ध्वज(तिरंगा) फाटलाकी कुठेही फेकून देतात यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होवू नये म्हणून नाग स्वराज फाऊंडेशनचे कार्यकर्ते राष्ट्रीय ध्वज उचलून सांभाळण्याचे कार्य करीत आहेत.

दि. 22 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीत जनजागृती अभियान सुरु झाले आहे. या अभियानाच्या दरम्यान पथनाटय, शाळा, महाविदयालयामध्ये स्टीकर, पोस्टर वितरण करुन तिरंगाची माहिती व नियमाची माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला यावेळी नाग स्वराज फाउंडेशनचे सचिव श्री हितेश डोर्लीकर सोबत हेमंत पराते, हर्षा डोर्लीकर, यज्ञेश कपले, गगन राउत, दिपाली पटले,रुपेश चाफलेकर,तृप्ती शेन्डे व इतर युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
● राष्ट्रध्वजाचा अवमान टाळा !●प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नका !●पताका म्हणून राष्ट्रध्वज वापरू नका !●तिरंग्याच्या रंगाचे पतंग उडवू नका !●राष्ट्रध्वज छापलेले कपडे घालू नका !●तिरंग्याच्या प्रतिकृतीचे केक कापू नका !●राष्ट्रीय अस्मितेच्या रक्षणार्थ या कार्यात सहभागी व्हावे..!! -आपली प्रतीक्षा खोतपाल [नाग स्वराज फाउंडेशन, नागपूर ] मो. 8149048001/7276301135



