
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड :- मौजे तिवडी येथील ग्रामपंचायत हद्दीतील (MGNREGS) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत बांधकाम सरपंच आणि सचिव यांच्या संगनमताने अत्यंत निष्कृष्ट होत असून सदर कामे गुणनियंत्रक विभागाचे नियमानुसार होत नसून अतिशय दर्जाहीन व कमी प्रमाणात साहित्य वापरून निष्कृष्ट होत आहे.

तरी सदर कामाची मोका पाहणी करून संबंधित कामाचे देयक काढण्यात येऊ नये. व संबंधितांनी बोगस काम केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी.

अशी तक्रार शाम माधव धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ) यांनी उमरखेड तहसीलदार यांना दिली आहे.

प्रतिलिपी म्हणूनमा.गटविकास अधिकारी, उमरखेड यांना निवेदन दिले आहे.



