
(स.पो.नि. शिवप्रकास मुळे यांच्या पुढाकाराने उपोषणाची सांगता.)
✍️ समाधान कांबळे (माहूर प्रतिनिधी)

माहूर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले अतुल पांडुरंग गावंडे हे दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी उपोषणास बसले होते, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी उपोषण स्थळी गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते अतुल पांडुरंग गावंडे यांच्या मागन्या मान्य करून त्यांना त्या संदर्भात पत्र देऊन उपोषणाची सांगता करण्यात आले.
उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका उपोषणकर्त्यास न्याय मिळावा या उद्देशाने त्यांच्या पाठीशी उभी होती,
कारण उपोषणकर्त्याची मागणी ही रास्त असल्यामुळे व त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार,
ता. उपाध्यक्ष समाधान कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे, सदस्य सदानंद पुरी, सदस्य शंकर भालेराव, सदस्य राहुल कांबळे, विक्रम जगताप, राजू मगरे व इतर उपोषणकर्ते अतुल गावंडे यांनी उपोषणाची सांगता झाल्यावर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विशेष आभार मानले.
माहूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. शिवप्रकाश मुळे, सिंदखेड पोलीस स्टेशनचे स.पो.नि. रमेश जाधवर, आरोग्य विभागाचे डॉक्टर निरंजन केशवे, सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे उपोषणकर्त्याला न्याय मिळावा यासाठी विशेष मेहनत घेतली.



