
रमाई आवास योजना व इतर आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास व या व्यतिरिक्त रेती माफक दारात देण्यात यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांनी केले आहे.
तालुका प्रतिनिधी समाधान कांबळे
माहूर शहर व तालुक्यात रमाई आवास योजना व इतर आवास योजना अंतर्गत घरकुले मंजूर झाली असून प्रशासनाच्या वतीने लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. परंतु लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होत नसून जप्ती साठ्याचे लिलाव धारकाकडून 7 ते 8 हजार रु. ब्रास एवढ्या चढ्या दराने पुरवठा करण्यात येत आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम सुरु करणे कठीण झाले आहे. आवास योजनेचे बहुसंख्य लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील नागरिक आहेत.

तसेच एका घरकुलाच्या बांधकामास किमान 15 ते 20 ब्रास रेतीची आवश्यकता असते. शासनामार्फत मोफत 5 ब्रास पुरवली तरी 15 ब्रास रेती लाभार्थ्यांना विकत घेणे क्रमप्राप्त आहे. जर 7 ते 8 हजार रुपये ब्रास एवढ्या चढ्या दारात उर्वरित रेती विकत घायची म्हटले तर 1 ते सवा 1.5 लाख रुपये रेती खरेदी मध्ये खर्च होतात.

शहरात अडीच लाख व ग्रामीण भागात सवा लाख रुपये घरकुल अनुदान असल्याने घरकुल लाभार्थ्यांना उर्वरीत रक्कमेतून घरकुलाचे बांधकाम☆ पूर्ण करणे अत्यंत अशक्यप्राय बाब बनली आहे. तर ग्रामीण भागातील लाभाथ्यांचे संपूर्ण अनुदान हे रेती मध्येच खर्च होतात, करीता घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास रेती व उर्वरित रेती माफक दरात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, मनून सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांनी हजारो घरकुल लाभारत्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयात माहूर येथे मोर्चा काढत रीतसर निवेदन देण्यात आले.

रमाई आवास योजना व इतर आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास व व्यतिरिक्त लागणारी रेती माफक दरात उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.


