✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)

पोफळी:- (दिनांक २६ फेब्रुवारी) पोलीस स्टेशन च्या समोरच अगदी हाकेच्या अंतरावर पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध वरळी मटका खुलेआम अगदी थाटात सुरु केला आहे.

गोर -गरिबांचे संसार उद्धवस्त करणाऱ्या वरळी मटक्याच्या नादी लागून पोफळी साखर कारखान्यातील उस तोड कामगार देशोधडीला तर लागलेच शिवाय उस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असल्याचे भयावह चित्र दिसत येत आहे.

सदरील मटका किंगवर पोलिसांचा धाक/जरब अजिबात दिसत नसून उद्धटपणे बिनदिक्कत मटका चालवीत जात आहेत.

सदरील मटका बहाद्दरांवर पोलीस अधीक्षकांनीच अंकुश लावावा असा सूर पोफळीतील जनतेचा निघत आहे.पोफळी पोलिसांना न जुमानणाऱ्या या मटकावाल्याचा बंदोबस्त पोलीस अधीक्षकांनी त्वरित करावा अशी मागणी जनतेकडून होत आहे.




