✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक 26 मार्च) सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड अंतर्गत होत असलेल्या सन २०२२-२३ च्या प्रशासकिय मान्यतेनुसार काम वेळेत पूर्ण न करुन घेतल्यामुळे उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना शासकिय सेवेतुन तात्काळ बडतर्फ करण्यासाठी
उपोषणकर्ते संतोष देवसिंग आडे (वाहतुकदार) हे दिनांक 25 मार्च 2025 पासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड आमरण उपोषणाला बसले आहेत.

उपविभाग उमरखेड अंतर्गत होत असलेला रस्ता क्र. १) माळ आसोली मोहदरी पिंपरी – ७ कोटी रुपये, २) दगड धानोरा- मुळावा पुल तरोडा कळमुला- ४ कोटी रुपये ३) पुसद उमरखेड रस्ता १४ कोटी ४३ लाख रुपये ४) उमरखेड – हरदडा रस्ता ७ कोटी रुपये.

या रस्त्याचे काम वेळेत पुर्ण न केल्यामुळे सदर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे. तसेच सदर रत्यामुळे वाहन धारकांच्या वाहनांची भरपाई देण्यात यावी. व वरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना संवेतुन बडतर्फ करण्यात यावे व सदर अपुर्ण रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करुन देण्यात यावे.

माहिती अधिकार कायदा २००५ मध्ये माहिती मागीतली असता भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणुन अर्धवट माहिती देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आलेली आहे.

सदर रस्त्यांच्या कामामध्ये अनियमितता. निकृष्ट दर्जाचे काम अपुर्ण असल्यामुळे व भ्रष्टाचार केल्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर संतोष देवसिंग आडे यांनी आमरण उपोषण मांडले आहे.



