
✍️ करण भरणे सर (ढाणकी प्रतिनिधी)
ढाणकी दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला होता. हा दिवस भारतासह जगभरात भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो.

आंबेडकरवादी लोक या दिनाला ‘समता दिन’ म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते.आज ढाणकी येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांची १३४वी जयंती ढाणकी येथे ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.
ढाणकी येथील मठ ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.

नंतर मठ पासून ट्रॅक्टवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून पुष्प आणि वेगवेगळ्या रंगाच्या फुग्यानी सजावट करून डी. जे च्या तालावर नाचत रॅली काढत डॉ आंबेडकर चौक येथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
ढाणकी शहरात चौका चौकात भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संपूर्ण समाजा तर्फे पोस्टर लावण्यात आले होते.
भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ढाणकी शहराला पूर्ण आंबेडकरवादी करून टाकले होते.

गावातून मुख्य मिरवणूक मार्गाने अतिशय उत्साहात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. डी. जे. च्या तालावर तरुण,तरुणींनी ठेका घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी लावण्यात आली होती.

गावातील असंख्य भीम सैनिक ,महिला मंडळ उपस्थित होते.गावात अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अतिशय शांततेत भीम जयंती पार पडली .



