
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड:- (दिनांक 27 जून) शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे सम्यक बुद्ध विहार येथे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना उपस्थित बौद्ध उपासक-उपासिका यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतीदूत समितीचे अध्यक्ष कुमार केंदेकर प्रमुख पाहुणे म्हणून धर्मगुरू भदंत कीर्ती बोधी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रेकर यांनी लोकराजे शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून अध्यक्ष समारोप केला. तसेच बदलत कीर्ती बोधी यांनी उपस्थित उपासक, उपासिका, तरुण मंडळ यांना त्रिसरण पंचशील दिले.

यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक भीम टायगर सेना शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रफुल दिवेकर शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी यांनी मानले.

यावेळी उषाताई इंगोले (अध्यक्षा रमा माता महिला मंडळ) यशोदा दिवेकर, यशोधरा धबाले, जानकाबाई इंगोले, उज्वला धबाले, योगेश दिवेकर, अभिनित दिवेकर, आकाश पाईकराव इत्यादी अनेक बौद्ध उपासक उपासिका तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




