
🔹एनडीपीएस कायद्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही.
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

महागाव (दि.17 ऑक्टोबर) यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंदे शस्त्र बाळगणाऱ्या तसेच उघड गुन्हे आरोपी शोध गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी याचे समूळ उच्चाटन व्हावे, या करिता पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भापोसे) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना गोपनीय माहितीवरून प्रभावी कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ, पुसद यांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाल्याने महागाव तालुक्यातील नगरवाडी येथील गजानन नारायण मेटकर यांच्या शेत सर्वे नंबर 12/1 मध्ये गांजा अमली पदार्थ झाडांची लागवड केलेली आहे,

अशी माहिती मिळाल्याने या संदर्भात प्राप्त माहितीवरून पथकाने तत्काळ वरिष्ठांना या बाबत अवगत करीत नगरवाडी येथील गांजाची लागवड असलेल्या शेतात जाऊन गजानन नारायण मेटकर यांच्या शेतातील गांजाची झाडे ताब्यात घेत पंचा समक्ष पंचनामा करून त्याच्या ताब्यातील शेताची पाहणी केली असता सदर शेतामध्ये एकूण 31 लहान मोठ्या आकाराची एकूण 37 किलो 500 ग्राम वजनाची गांजा अमली पदार्थ झाडे असा एकूण एक लाख 87 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने गांजाची झाडे जप्त करून ताब्यात घेऊन गजानन नारायण मेटकर वय 50 वर्षे रा. नगरवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांच्या विरुद्ध महागाव पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अधिनिय एनडीपीएस कलम 8 (ब) 20 बी 1 अपराध क्र. 520/ 2025 प्रमाणे गुन्हा नोंद सह कार्यवाही करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ही अवैधधंदे, शस्त्र बाळगणारे गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी करण्याचे उच्चाटन करण्यास प्रतिबद्ध असून या पुढे अशा पद्धतीची माहिती असल्यास जनतेने कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना पोलिसांना सहकार्य करावे यावेळी पोलिसातर्फे आव्हान करण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भापोसे) सहाय्यक अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात (मपोसे), सहाय्यक उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोलीस निरीक्षक धनराज निळे पोलीस स्टेशन महागाव यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोकरे, सहायक फौजदार मुन्ना आडे, पोलीस हवालदार संतोष बोरगे, पोलीस हवालदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव यांच्या पथकाने यशस्वीरित्या कार्यवाही पार पाडली.दि.4 ऑक्टोबर 2023 रोजी महागाव तालुक्यातील बर्गेवाडी शेत शिवारात 12 क्विंटलच्या आसपास गांजा किंमत 25 लाख रुपये होती.सदर गांजाची कार्यवाही पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या कार्यकाळात झाली होती.

या मध्ये चार जणांना अटक झाली होती. मागील वेळी पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोड यांच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये क्राईम प्रचंड प्रमाणात वाढल्याने खासदार संजय देशमुखांनी जिल्ह्यात क्राईम वाढल्याचे शासनाचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे नव्या दमाचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची नियुक्ती झाली. यांच्या काळात यवतमाळ शहरातील क्राइम चे प्रमाण कमी झाले. परंतु अवैध धंद्यात प्रचंड वाढ झाली.

गुटखा तस्करी, रेती तस्करी, गोवंश तस्करी या मध्ये वाढ झाली. शेतकरी सततच्या नैसर्गिक संकटाने कमालीचा हैराण झाला आहे. यामुळे वैतागून शेती लावगड खर्चाच्या तुलनेत उत्पादन नाममात्र होत आहे, शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल भाव असल्याने शेतकरी अशा मार्गाकडे वळत असल्याचे बोलल्या जाते.)



