✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड – शहरातील काही दिवसापूर्वी सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल उमरखेड जनशक्ती पॅनल लागल्याने आणि ऐतिहासिक विजय प्राप्त करून आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी नगरपरिषद प्रांगणामध्ये पदग्रहण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


कार्यक्रमाची सुरुवात राजस्थान भवन येथून नवनिर्वाचित नगराध्यक्ष 17 नगरसेवक बस मध्ये बसून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज येथील तेल चित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर लगेच नगर परिषदेमध्ये या समारंभाला सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांनी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच भारतीय संविधान च्या प्रतला पुष्प वाहून वंदन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव कांबळे, ॲड संतोष जैन,तातू देशमुख, इनायत तुल्ला जनाब, रामभाऊ देवसरकर, गोपालभाऊ अग्रवाल, सुभाषराव दिवेकर,ॲड. बाळासाहेब नाईक, अजय नरवाडे, ॲड. मुटकुळे, सतीश नाईक इत्यादी अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी ॲड संतोष जैन, तातू देशमुख, साहेबराव कांबळे,राम देवसरकार, इनायत तुल्ला जनाब, तालिब भाई, तेजश्री जैन यांनी सुद्धा आपआपले मत यावेळी व्यक्त केले.




यावेळी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे, आणि विदर्भ मराठवाडा विकास आघाडी चे अनेक गटनेते व कार्यकर्ते तसेच शेकडो नागरिक, महिला व पत्रकर बंधू उपस्थित होते.



