(सरकारी रुग्णवाहिके च्या तुलनेत खाजगी रुग्णवाहिकेला रुग्णांची पहिली पसंती)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर ( कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – शहरात कोरोनाच्या काळापासून अनेक आजारामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. उमरखेड येथे उपजिल्हा रुग्णालय असून सुद्धा संपूर्ण सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना तातडीने उपचारासाठी नांदेड,पुसद यवतमाळ अशा जिल्ह्याच्या ठिकाणी जायाला लागत आहे.

सरकारी हॉस्पिटलची ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना तात्काळ खाजगी रुग्णवाहिकेची गरज भासत असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका ह्या जलद गतीने जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर वेळेवर उपचार होण्यासाठी हा प्रवास प्रभावी ठरत आहे. त्यामुळे शेकडो रुग्णांचे जीव वाचण्याचा प्रयत्न खाजगी रुग्णवाहिके चे रुग्णवाहक (चालक) हे करत असल्याची कबुली रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे.


आता खाजगी कर्डियाक (ॲम्बुलन्स) रुग्णवाहिका मध्ये ऑक्सीजन सुविधा, मॉनिटर सुविधा, सिरींज पंप सुविधा, एसी नॉन एसी अशा आयसीयू सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांसाठी खाजगी रुग्णवाहिका हेच वरदान ठरत असल्याचे उमरखेड शहरात दिसून येत आहे.





